अर्णव वाघ याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड.
संजय आनंदकर स्पोर्ट्स अकॅडमी चे यश.

अहिल्यानगर प्रतिनिधी
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे विभागस्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धा २७ व २८ ऑक्टोबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल वाडिया पार्क अहिल्यानगर येथे संपन्न झाल्या.
येथील रयत शिक्षण संस्थेच्या महादजी शिंदे विद्यालयाचा विद्यार्थी आणि संजय आनंदकर स्पोर्ट्स अकॅडमी चा खेळाडू अर्णव गोविंद वाघ याने १४ वर्षे वयोगटात ६३ किलो वजन गटांमध्ये सुवर्णपदक पटकावून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड पक्की केली. गोंदिया येथे होणाऱ्या “राज्यस्तरीय शालेय स्पर्धे”मध्ये अर्णव पुणे विभागाचे प्रतिनिधित्व करेल.
याबरोबरच स्पर्धेमध्ये आरव कुलकर्णी याने रौप्यपदक तर यश खाकाळ, अंकित खामकर, शरयू लोंढे, श्रेया आळेकर यांनी कांस्यपदक मिळविले.
विजेते खेळाडू संजय आनंदकर स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रशिक्षक मास्टर जयेश व सिद्धेश आनंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली नियमितपणे सराव करतात.
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल अर्णव गोविंद वाघ याचे आमदार संग्राम भैय्या जगताप, आमदार विक्रमसिंह पाचपुते, ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार, बाबासाहेब भोस, राजेंद्र नागवडे, मा. आमदार राहुल जगताप, जि. प. सदस्य सचिन भाऊ जगताप, मा.पं.समिती सभापती सिद्धेश्वर देशमुख, मा. पं. समिती सदस्य बाळासाहेब मनसुके, मांडवगण सेवा सोसायटीचे चेअरमन झुंबरराव बोरुडे, मा.सरपंच अंबादास घोडके, मा.चेअरमन दादाराम बोरुडे, सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र घोडके, ग्रँडमास्टर संजय आनंदकर, मुख्याध्यापक दिलीप भुजबळ, क्रीडा विभाग प्रमुख सचिन झगडे यांच्यासह शिक्षक, पालक, खेळाडू यांनी अभिनंदन करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.











