महाराष्ट्र

नागवडे इंग्लिश मिडीयम स्कूल चे स्नेहसंमेलन उत्साहात.

बाल कलाकारांच्या सादरीकरणाने पालक मंत्रमुग्ध.

प्रा. सुरेश म्हेत्रे उपसंपादक

अहिल्यानगर: तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान संचलित शिवाजीराव नागवडे डॅफोडील्स स्कूल व कौशल्यादेवी नागवडे इंग्लिश मीडियम स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन भव्य रंगमंचावर उत्साहात संपन्न झाले. विद्यार्थ्यांच्या सशक्त अभिनयाने व भावस्पर्शी सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकून घेतली.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे यांनी भूषविले. यावेळी बोलताना त्यांनी, काळाची गरज असलेला “आर्टिफिशिअल इंटेलिजन्स” चा अभ्यासक्रम यावर्षी पासून विद्यार्थ्यांसाठी सुरू करणार असल्याचे सांगून बालकलाकारांना विविध कला, गुणदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या.

पोलीस निरीक्षक किरण शिंदे, राजेंद्रआबा म्हस्के, नागवडे कारखान्याचे संचालक प्रशांत दरेकर यांनी मनोगत व्यक्त करत भव्य स्वरूपात स्नेहसंमेलनाचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देत असल्याबद्दल कौतुक केले.

प्रा. राहुल भांडवलकर यांनी शैक्षणिक व क्रीडा क्षेत्राची यशस्वी वाटचाल व विविध उपक्रम यांची माहिती देत शाळेचे वार्षिक यश अधोरेखित केले.

विविधतेतून एकता दर्शविणारी “एक राष्ट्र, एक रंगमंच, अनेक संस्कृती दर्शन” ही संकल्पना ठेवून “मिले सुर मेरा तुम्हारा” म्हणत विद्यालयाने यावर्षी स्नेहसंमेलनाद्वारे देशातील विविध राज्यांचे सण समारंभ, वेशभूषा यांचे दर्शन रंगमंचावर घडविले. शंभू वंदना, रावण, घूमर, लावणी च्या सादरीकरणाने बाल कलाकारांच्या सशक्त अभिनयाचे दर्शन घडविले तर कराटे प्रात्यक्षिकाद्वारे महिला स्वसंरक्षणाचा संदेश देण्यात आला.

यावेळी ज्येष्ठ नेते राजेंद्रआबा म्हस्के, नगरसेविका अनिता औटी, नगरसेवक अनिल औटी, नागवडे कारखान्याचे संचालक प्रशांत दरेकर, सावता हिरवे, प्रवीण लबडे, भाऊसाहेब नेटके, छत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सूर्यवंशी, शिवाजीराव नागवडे लॉ कॉलेजच्या प्राचार्य चोभे मॅडम, सोनिया गांधी पॉलिटेक्निकचे प्राचार्य अमोल नागवडे यांच्यासह शैक्षणिक, सामाजिक, उद्योग, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निरीक्षक एस पी गोलांडे, यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापिका नीतू दुलानी, कोरिओग्राफर सुमेध गजभिये यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयेश आनंदकर यांच्यासह इयत्ता नववीच्या विद्यार्थी – विद्यार्थिनींनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button