नागवडे इंग्लिश मिडीयम स्कूलची माझी विद्यार्थिनी ठरली सुवर्णकन्या.
नागवडे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापक नीतू दुलानी यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान.

प्रतिनिधी
नागपूर येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाने दिल्ली संघाचा ७-२ असा पराभव करत सुवर्णपदक पटकावले. विजयी संघात नागवडे इंग्लिश मिडीयम स्कूल ची मा. विद्यार्थिनी श्रुतिका नितीन वाबळे हिने महाराष्ट्राचे नेतृत्व करत सुवर्णकन्या ठरण्याचा मान मिळवला. नागवडे इंग्लिश मिडीयम स्कूल येथे श्रुतिका चा तिच्या यशाबद्दल सत्कार करण्यात आला, त्यावेळी बोलताना तिने सांगितले कि स्कूल मध्ये शिकत असताना खेळाची आवड त्याबरोबर क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे पाया तयार झाला व हे यश प्राप्त झाले. खेळाबरोबर अभ्यास देखील महत्वाचा आहे हे देखील न चुकता सांगितले.
लोकशक्ती न्यूज नेटवर्क महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार नागवडे इंग्लिश मिडीयम स्कूल च्या मुख्याध्यापिका नीतू दुलानी याना प्रदान करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय केलेल्या कार्यबदल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याबद्दल तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे, विश्वस्त अनुराधाताई नागवडे, निरीक्षक एस. पी. गोलांडे, यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.











