नागवडे स्कूल च्या पाच व्हॉलीबॉलपटूंची विभाग स्तरावर निवड.

अहिल्यानगर – क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत अहिल्यानगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत येथील तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान च्या शिवाजीराव नागवडे डॅफोडील्स स्कूल व कौशल्यादेवी नागवडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या १४ व १७ वर्ष वयोगट मुलींच्या संघाने कौशल्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन करीत उपस्थित त्यांची मने जिंकली.
सदर स्पर्धा ९ व १० ऑक्टोबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल वाडिया पार्क अहिल्यानगर येथे संपन्न झाल्या. स्पर्धेमध्ये विद्यालयाच्या खेळाडू शरयू कांडेकर, जेनी साठे, गायत्री वाबळे, सर्वज्ञा भोर, श्रावणी कोकरे यांनी चेंडूवर नियंत्रण राखत सर्वोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत विभागीय स्पर्धेसाठी आपली निवड पक्की केली.तसेच १५ व १६ ऑक्टोबर दरम्यान माध्यमिक विद्यालय म्हसोबाची वाडी ता इंदापूर येथे संपन्न झालेल्या पुणे विभागीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये देखील आपल्या कौशल्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन करून विद्यालयाचे आणि श्रीगोंदा तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्याचे नाव उंचावले.
यशस्वी खेळाडूंना विद्यालयाचे क्रीडाशिक्षक अक्षयकुमार शिंदे, कैलास ढवळे, रोहित दानवे, राजश्री नागवडे यांचे मार्गदर्शन लाभले.
विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल खेळाडूंचे तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे, विश्वस्त अनुराधाताई नागवडे, निरीक्षक एस पी गोलांडे, मुख्याध्यापिका नीतू दुलानी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.











