पश्चिम महाराष्ट्र

संजय आनंदकर स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंची गगनभरारी

श्रीगोंद्याच्या ७ वेगवान स्केटर्सची विभागीय स्पर्धेसाठी निवड

गणेश सुपेकर अहिल्यानगर प्रतिनिधि

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय रोलर स्केटिंग स्पर्धा प्रियदर्शनी पब्लिक स्कूल, भिंगार येथे संपन्न झाल्या.स्पर्धेत येथील संजय आनंदकर स्पोर्ट्स अकॅडमीच्या संघाने सहभाग घेत चमकदार कामगिरी केली. अकॅडमीच्या सात खेळाडूंची पुणे विभागीय शालेय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

वेगवान हालचाली करत, उत्कृष्ट संतुलन राखत, चपळतेने खेळाडूंनी यश मिळविले.विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे – १४ वर्षे वयोगट – तेजस्विनी दीपक ढवळे, शौर्य स्वानंद चव्हाण, स्वयम विक्रम भोसले.

१७ वर्षे वयोगट – भार्गवी प्रकाश बोरुडे, यश राजेंद्र खाकाळ

१९ वर्षे वयोगट – ओंकार राजू गोरे, सागर जयकुमार भुयार

तसेच रुद्र ढवळे, आर्यन लकडे, ओमराजे श्रीराम, कैवल्य कोथिंबीरे, क्षितिज बोरुडे, राजवीर कातोरे, रोनित फुलपगार, आर्यन शिंदे, राज औटी, उदयनराजे धारकर, शिवम चौगुले, विश्वजीत चव्हाण, वैष्णवी शिंदे, आर्यन गोरे, श्रेयश घुगे, वरद पाटील, साहिल भंडारी त्यांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला.

विजेते खेळाडू संजय आनंदकर स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रशिक्षक जयेश व सिद्धेश आनंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली नियमितपणे सराव करतात.

यशस्वीतांचे आमदार विक्रमसिंह पाचपुते, ज्येष्ठ नेते घनश्याम अण्णा शेलार, बाबासाहेब भोस, राजेंद्र दादा नागवडे, मा. आमदार राहुल दादा जगताप, ग्रँडमास्टर संजय आनंदकर, राजू दादा गोरे, डॉ.विक्रम भोसले, प्रकाश बोरुडे , ॲड.स्वानंद चव्हाण, दीपक ढवळे , श्रीगोंदा तालुका क्रीडा समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह पालकांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button