यश मिळवण्यासाठी मोबाईलला दूर ठेवा,नीट परीक्षेत मुलींमध्ये देशात पहिली आलेले श्रावणी कुदळेचा विद्यार्थ्यांना सल्ला
भिगवण येथे मराठा महासंघाच्या वतीने गुणवंतांचा सत्कार.

विजयकुमार गायकवाड
भिगवण
नुकत्याच पार पडलेल्या नीट परीक्षेत नेत्र दीपक यश मिळवलेल्या भिगवण परिसरातील विद्यार्थ्यांचा सन्मान अखिल भारतीय मराठा महासंघाच्या भिगवण शाखेच्या वतीने रविवार ( ता.२६) रोजी छत्रपती शिवराय वाचनालयात संपन्न झाला. यामध्ये देशात ओबीसी महिलांमधून पहिली ,व महाराष्ट्रात प्रथम आलेली ,श्रावणी कृष्णा कुदळे (खडकी) 720 पैकी 715 गुण , प्रणव पुरणलाल टेंभुर्णे ( भिगवण) 720 पैकी 700 गुण , अनुश्री अजय थोरात ( भिगवण) 720 पैकी 692 गुण , अपूर्व वैभव दोबाडा ( जिंती) 720 पैकी 594 गुण, प्रेरणा प्रदीप सोनने ( डाळज) 720 पैकी 576 गुण, समर्थ नितीन खानावरे ( भिगवण) 720 पैकी 547 गुण, समृद्धी सतीश हगारे (डाळज) 720 पैकी 535 गुण, या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रकाश बापू ढवळे, पद्माकर माडगे, राजकुमार मस्कर सर अॅड.पांडुरंग जगताप, डॉ. माधवराव नाईक निंबाळकर, अशोकराव साळुंखे, डॉ. जयप्रकाश खरड, अजित रणदिवे,सचिन जांभले,विजयकुमार गायकवाड,भरत मोरे,अनिल गलांडे, विकास वाघ, श्रीकांत माने ,दत्ता जाधव,शरद जगदाळे, डॉ. पद्मा खरड, या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना श्रावणी कुदळे हिने सांगितले की, मी सलग तीन वर्ष मोबाईल दूर ठेवून अभ्यास केल्याने मला हे यश संपादन करता आले. त्याचबरोबर इतरही गुणवंत विद्यार्थ्यांनी आपण मोबाईल दूर ठेवून अभ्यास केल्याचे सांगितले. कार्यक्रमास डॉ. अजय थोरात.डॉ. प्राची थोरात, डॉ. नितीन खानावरे धनाजी नलवडे,दादा रणसिंग, यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक महासंघाचे शाखाध्यक्ष डॉ.संकेत मोरे यांनी केले तर आभार सुचिता साळुंखे यांनी मानले.










