विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या व्यक्तींचा मराठा महासंघाकडून सन्मान.
ज्ञानदानाबरोबरच पाठीवर कौतुकाची थाप टाकणाऱ्या उपक्रमाचे मान्यवरांनी केले कौतुक.

विजयकुमार गायकवाड तालुका प्रतिनिधी इंदापूर
भिगवण : भिगवण ( ता.इंदापुर) येथील अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या छत्रपती शिवराय वाचनालयाच्या वतीने भिगवण व परिसरातील विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या तब्बल ४० व्यक्तींचा सन्मान वेंकटेश लॉन्स शेजारील हॉटेल विश्वजीत येथे रविवार( ता.१५) रोजी संपन्न झाला. यामध्ये शैक्षणिक, सामाजिक, राजकीय कला व क्रीडा क्षेत्रात यश संपादन केलेल्या व्यक्तींचा दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, इंदापूर पंचायत समिती सदस्या हेमा माडगे, पुणे जिल्हा परिषद च्या माजी सदस्या प्रमिला जाधव यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सन्मान केला. यावेळी इंदापूर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, करमाळा पंचायत समितीचे उपसभापती अॅड.अजित विघ्ने, इंदापूर अर्बन बँकेचे संचालक अशोक शिंदे, बाळासाहेब भांडवलकर, सुरेश जगताप, गजानन जगताप यांनी मराठा महासंघाच्या वतीने गेले २५वर्ष चालवण्यात येत असलेल्या राजमाता जिजाऊ व्याख्यानमातेचे कौतुक करत समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन जात ज्ञानदानाबरोबर सामाजिक सलोखा राखत यश संपादन करणारा व्यक्तीच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमास मराठा महासंघाचे शाखाध्यक्ष डॉ. संकेत मोरे, पद्माकर माडगे,डॉ. जयप्रकाश खरड, अशोक साळुंखे,छगन वाळके, अजित रणदिवे, सुनील वाघ, सुचिता साळुंखे, आधी पदाधिकाऱ्यांसह महासंघाचे कार्यकारणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सुहास गलांडे, प्रस्ताविक महासंघाचे पुणे जिल्हा संघटक राजकुमार मस्कर यांनी केले तर आभार मराठा महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष अॅड.पांडुरंग जगताप यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विकास वाघ, विजयकुमार गायकवाड, दत्तात्रय जाधव, दिनानाथ मारणे, दिपक वाघ,भारत गायकवाड , शरद जगदाळे, श्रीकांत माने,दिपक सूर्यवंशी, सतिश काळे,अनिल गलांडे, अभिनव वाघ, वाचनालयाचे ग्रंथपाल दादा रणसिंग यांनी विशेष परिश्रम घेतले.










