छत्रपती श्री शिवाजी महाराज राज्यस्तरीय मूट कोर्ट स्पर्धेत श्री शिवाजीराव नागवडे विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीचे उत्कृष्ट यश.
कु. मंजिरी मुरकुटे यांना Best Petitioner Award प्राप्त.

श्री शिवाजी मराठा सोसायटीचे विधी महाविद्यालय, पुणे येथे दि. १४ मार्च २०२६ रोजी “छत्रपती श्री शिवाजी महाराज सातवी राज्यस्तरीय मूट कोर्ट स्पर्धा – २०२६” उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला मुंबई उच्च न्यायालयाचे मा. न्यायमूर्ती सूर्यकांत देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यभरातील एकूण ३२ संघांनी सहभाग नोंदविला होता. श्रीगोंदा येथील श्री शिवाजीराव नागवडे विधी महाविद्यालयाच्या संघाने देखील या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. महाविद्यालयाच्या संघात श्री रूपेश पोखरणा, कु. मंजिरी मुरकुटे आणि कु. साक्षी मचाले यांनी सहभाग घेतला. स्पर्धेत उत्कृष्ट युक्तिवाद आणि प्रभावी मांडणीमुळे कु. मंजिरी मुरकुटे यांना Best Petitioner Award प्राप्त झाला. व त्यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले, त्यांच्या या यशाबद्दल मुंबई उच्च न्यायालयाचे मा. न्यायमूर्ती सूर्यकांत देशमुख यांनी संघाचे कौतुक करून विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या संघाला प्रा. रुपाली गोळे व प्रा. पी. जे. फाटे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अंजुला चौबे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे, विश्वस्त अनुराधाताई नागवडे तसेच संस्थेचे निरीक्षक एस. पी गोलांडे सर यांनी संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.










