राज्यस्तरीय ऑलिम्पियाड परीक्षेत नागवडे स्कूलचे उल्लेखनीय यश.

गणेश सुपेकर अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी:
एक्झलंट ऑलिंपियाड फाउंडेशन यांच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या एक्झलंट ऑलिंपियाड राज्यस्तरीय परीक्षेत श्रीगोंदा येथील तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान संचलित शिवाजीराव नागवडे डॅफोडील्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर क्रमांक मिळवून उल्लेखनीय कामगिरी करत राज्यस्तरावरील प्रथम,द्वितीय तसेच तृतीय क्रमांक पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत इयत्ता पहिलीतील ओवी अमोल नागवडे हिने १९२ गुण मिळवून राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. तसेच इयत्ता दुसरीतील मनस्वी मनोज साखरे व शंभूराज प्रविण जामदार यांनी प्रत्येकी १९८ गुण मिळवून राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळविला.तसेच स्वरूप गोरख कोथिंबिरे याने १९४ गुणांसह तिसरा आणि ज्ञानेश्वरी राहुल जामदार हिने १९२ गुणांसह राज्यात चौथा क्रमांक पटकावला.तर इयत्ता तिसरी तील प्रसन्ना सूर्यभान गोलांडे हिने १८८ गुणांसह राज्यात तिसरा क्रमांक मिळविला.
विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रदादा नागवडे, विश्वस्त अनुराधाताई नागवडे, निरीक्षक एस. पी. गोलांडे, मुख्याध्यापिका नीतू दुलानी यांच्यासह पालक, शिक्षक व शाळा व्यवस्थापनाकडून अभिनंदन करण्यात येत असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली असे मत तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्रदादा नागवडे यांनी व्यक्त केले.









