महाराष्ट्र

रंगोत्सव चित्रकला स्पर्धेत नागवडे स्कूलचे यश.

बाल चित्रकारांनी केली बक्षिसांची लयलूट.

गणेश सुपेकर अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी

रंगोत्सव सेलिब्रेशन आयोजित रंगोत्सव चित्रकला स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला. विविध वयोगटात संपन्न झालेल्या या स्पर्धेमध्ये तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान संचलित शिवाजीराव नागवडे डॅफोडील्स स्कूल व कौशल्यादेवी नागवडे इंग्लिश मेडियम स्कूलच्या बाल चित्रकारांनी सुरेख रंग संगती करून चित्रांना मनमोहक रूप देत बक्षिसांची लय लूट केली.

स्पर्धेमध्ये एकूण ४० विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेत उत्कृष्ट कामगिरी केली.स्पर्धेमध्ये ए + श्रेणी मिळवून एक ते आठ क्रमांक पटकावून बक्षीसास पात्र ठरलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे –

स्वरा जामदार – मिनी प्रोजेक्टर, अंश ढवळे – क्रिकेट किट, आराध्या जगताप – हेडफोन, आनंदीता जाधव – स्विमिंग पूल किट, विहान गुणवरे – रोलर स्केट, आयुष परकाळे – फुटबॉल, तनिष्का खेतमाळीस – स्कूल बॅग, वेदांत गाडेकर – स्कूल बॅग.

सर्व यशस्वी बालचित्रकारांना सरिता सुपेकर, सोनाली पिटेकर यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वीतांचे तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे, विश्वस्त अनुराधाताई नागवडे, निरीक्षक एस पी गोलांडे, मुख्याध्यापिका नीतू दुलानी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button