
अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई ) इ.१० वी चा निकाल नुकताच जाहीर झाला. शिवाजीराव नागवडे डॅफोडिल्स स्कूल च्या विद्यार्त्यानी 100% निकालाची परंपरा कायम ठेवत घवघवीत यश संपादन केले. शिवाजीराव नागवडे डॅफोडिल्स स्कूल च्या वतीने सर्व गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता.
यावेळी बोलताना पालकांनी सांगितले कि शाळेचे सूक्ष्म नियोजन, शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन व विद्यार्थ्यांची मेहनत याचे फलित म्हणून आज सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी यशस्वी झाले आहेत. शाळेने विद्यार्थ्यांसाठी वर्षभर विविध गुणवत्तापूर्ण उपक्रम राबविले त्याचे हे फलित असल्याचे सांगून शालेय प्रशासनाचे आभार व्यक्त केले.
अनुक्रमे प्रथम पाच विद्यार्थी पुढीलप्रमाणे –
प्रद्युम्न भोस ९४.२० , श्रुतिका कसरे ९०.८०, सर्वज्ञा भोर ८८.६०, श्रद्धा वाळके ८२.२० , यश जाधव ८१.२०.
गुणवंत विद्यार्थ्यांचे तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे, विश्वस्त अनुराधाताई नागवडे, निरीक्षक एस पी गोलांडे, मुख्याध्यापिका नीतू दुलानी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.











