शिवाजीराव नागवडे डॅफोडील्स स्कूलमध्ये नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे उत्साही वातावरणात स्वागत.
शिक्षकांचा उत्साह यामुळे विद्यार्थ्यांचा पहिला दिवस अधिक आनंदी ठरला आहे.

गणेश सुपेकर अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी

अहिल्यानगर :- श्रीगोंदा तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेले शिवाजीराव नागवडे डॅफोडील्स स्कूल, श्रीगोंदा येथे नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे आनंदी वातावरणात व उत्साहात स्वागत करण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शाळेच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. शाळेच्या परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली होती. रांगोळी तसेच प्रेरणादायी संदेशफलक, शैक्षणिक माहिती, सेल्फी स्टँड अश्या नाविन्यपूर्ण उपक्रमाने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी शिक्षकांचा उत्साह यामुळे विद्यार्थ्यांचा पहिला दिवस अधिक आनंद आहे ठरला असे मत पालकांनी देखील व्यक्त केले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे हसतमुखाने स्वागत करून त्यांना नवीन अभ्यासक्रम शालेय तसेच विविध उपक्रमांची माहिती दिली. नवीन शैक्षणिक वर्ष म्हणजे नवी संधी नवीन स्वप्ने आणि नवीन ध्येय पूर्ण करण्याची सुरुवात आहे. विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास, शिस्त सकारात्मक दृष्टीतून ठेवून शिक्षण घ्यावे तसेच शालेय कला क्रीडा अशा विविध उपक्रमांमध्ये देखील विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे मत यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका नीतू दुलांनी यांनी मांडले विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विज्ञान गणित प्रदर्शन, क्रीडा स्पर्धा तसेच संपूर्ण वर्षात घेण्यात येणाऱ्या अनेक उपक्रमाबद्दल माहिती देण्यात आली शिवाजीराव नागवडे डॅफोडील्स स्कूल येथे आधुनिक तंत्रज्ञान च्या साह्याने गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते तसेच अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन नाविन्यपूर्ण शिक्षण पद्धती आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो त्याचे फलित म्हणून 100% निकालाची परंपरा आम्ही राखली आहे. तसेच डिजिटल युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा अभ्यासक्रम आपण यावर्षीपासून सुरू करत आहोत. तसेच डिजिटल पॅनल बोर्ड देखील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देणार आहोत असे मत निरीक्षक एस. पी. गोलांडे यांनी मांडले. सुट्टीनंतर शाळेचा परिसर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या हास्याने आणि उत्साहाने गजबजून गेला होता. नव्या वर्गात प्रवेश करण्याची उत्सुकता, आपल्या जुन्या तसेच नवीन मित्र-मैत्रिणींना भेटण्याचा आनंद आणि नवीन गोष्टी शिकण्याची जिज्ञासा विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होती.
यावेळी तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्रदादा नागवडे, विश्वस्त अनुराधाताई नागवडे यांनी देखील विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.









