क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले यांच्या १३५ व्या पुण्यतिथी निमित्त दौंड तालुक्याची आढावा बैठक.

दौंड प्रतिनिधी:
कुरकुंभ (ता. दौंड) येथील तनिष्का प्युअर व्हेज हाँटेल येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची बैठक संपन्न पुणे येथे २८ नोव्हेंबर रोजी समता भूमी येथील कार्यक्रमास तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर लोकांनी उपस्थिती दाखवावी, असे आवाहन प्रदेश संघटक रविभाऊ सोनवणे यांनी केले. या वेळी पुणे विभागीय अध्यक्ष प्रितेशभाऊ गवळी यांनी सर्व समता पदाधिकारी यांना आव्हान केले की जास्तीत जास्त तरुणांनी समता परिषदेत कार्यरत व्हावे व समता परिषदेचा विचारांचा प्रसार करावा यावेळी आरपी आय चे दौंड तालुका अध्यक्ष नवनाथ गायकवाड, दौंड तालुका समता परिषद अध्यक्ष विजय गिरमे, उद्योजक विजय शिवरकर, रामभाऊ जाधव यांनी आपले विचार व्यक्त केले.
या वेळी समता परिषदेचे प्रदिप बनसोडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख किशोर वचकल,प्रतिक राऊत, समता परिषद दौंड तालुका संघटक भिमा झगडे, बाळासाहेब गिरमे,महेश भागवत,वैभव झगडे संदिप भागवत,ॠषीकेष जाधव, निलेश धुमाळ,महेश इंगळे,भुषण राऊत,निखील बोराटे, ज्ञानेश्वर झगडे , नवनाथ भागवत, धनंजय गिरमे, संदिप झगडे व दौंड तालुक्यातून झगडेवाडी,कुरकुंभ,गिरीम, नांदूर, सहजपूर,राहू,स्वामी चिंचोली,पारगाव, केडगाव परिसरातून समता सैनिक, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
सूत्रसंचालन समता परिषदेचे जिल्हा सरचिटणीस अनिकेत भागवत यांनी केले, तर समता परिषद दौंड तालुका उपाध्यक्ष प्रविण होले यांनी आभार मानले.











