समता पुरस्कार-२०२५ प्रदान सोहळा समता भूमी, फुले वाडा, पुणे येथे संपन्न.
अर्थतज्ज्ञ मा. डॉ. सुखदेवजी थोरात यांना समता पुरस्कार-२०२५ प्रदान

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने दिला जाणारा समता पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत, अर्थतज्ज्ञ मा. डॉ. सुखदेवजी थोरात यांना आज समता भूमी फुले वाडा, पुणे येथे माजी केंद्रीय मंत्री मा. उपेंद्रजी कुशवाह यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आ. पंकज भुजबळ यांनी, तर सन्मान पत्राचे वाचन डॉ. शेफाली भुजबळ यांनी केले.

सामाजिक क्षेत्रात उल्लखेनीय करणाऱ्या व्यक्तीला महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री मा. छगनराव भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली समता परिषदेच्या वतीने समता पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्कारामध्ये रुपये १ लक्ष, फुले पगडी, मानपत्र शाल आणि स्मृतीचिन्ह यांचा समावेश आहे.
भारतीय सामाजिक-आर्थिक विचार विश्वात मोलाची छाप सोडणारे अर्थशास्त्रज्ञ, शिक्षक, अभ्यासक आणि धोरणनिर्माते म्हणून डॉ. थोरात यांचे नाव विशेष आदराने घेतले जाते. सामाजिक न्याय, आर्थिक समानता आणि शिक्षण सर्वांसाठी खुले करण्याच्या दिशेने त्यांनी केलेल्या कार्याची देशव्यापी दखल घेतली गेली आहे. पुरस्काराला उत्तर देतांना त्यांनी क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत महात्मा फुलेंच्या सामाजिक चळवळीने अनेक समाजसुधारक निर्माण केले. त्याला सामाजिक व राजकीय चळवळींना प्रोत्साहन दिले. ही परंपरा शेवटी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे नेली असल्याचे सांगितले. तसेच महात्मा फुले समता परिषदेच्या कार्याची प्रशंसा करत आठवणींना उजाळा दिला.
यावेळी मा. कुशवाह यांनी मनोगत मांडताना, सन २००६ पासून भुजबळ साहेब व समता परिषदेशी जोडलो गेलो असून बिहारमध्ये ओबीसींच्या प्रश्नांवर त्यांच्या नेतृत्वात मेळावे घेऊन न्याय हक्कासाठी लढा दिला जात आहे. देशातील ओबीसी समाजासाठी भुजबळ साहेबांचे योगदान महत्वपूर्ण असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरूच राहील, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मा. रुपालीताई चाकणकर, माजी मंत्री मा. बाळासाहेब शिवरकर, प्रा.लक्ष्मण हाके, समता परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष बापू भुजबळ, महिला प्रदेशाध्यक्षा मंजिरीताई धाडगे, सत्संग मुंडे, डॉ. स्नेहा सोनकाटे, विशाखा भुजबळ, डॉ. सुदर्शन घेरडे, अँड.मृणाल ढोले,यश बोरावके , प्रितेश गवळी, पंढरीनाथ बनकर,महिला शहर अध्यक्ष वैष्णवी सातव, पुणे जिल्हा अध्यक्ष अनिल लडकत महिला जिल्हाध्यक्षा निलम होले, पुणे शहर कार्याध्यक्षा गौरी पिंगळे,गौतम बेंगाळे, विभागीय संघटक सोमनाथ भुजबळ, अविनाश चौरे,संदिप लडकत,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख किशोर वचकल, पुणे शहर कार्याध्यक्ष सागर दरवडे, कोथरूड अध्यक्ष प्रदिप हुमे, नंदकुमार गोसावी, दौंड तालुका अध्यक्ष विजय गिरमे, पुरंदर तालुका उपाध्यक्ष किसन वाघोले, बारामती तालुका अध्यक्ष यांच्यासह समता परिषदेचे पदाधिकारी व राज्यभरातील समता सैनिक उपस्थित होते.











