पुणेमहाराष्ट्र

अ.भा.महात्मा फुले समता परिषद पुणे जिल्हा महिला सरचिटणीस पदी प्रिया जगताप.


पुणे : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पुणे जिल्हा महिला सरचिटणीस पदी सौ.प्रिया सागर जगताप यांना नुकतेच मुंबई येथे नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

  अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे “माजी उपमुख्यमंत्री ना. छगनराव भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीत राज्यातील विविध जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष, तालुका व शहर अध्यक्षांची निवड करण्यात आली. या निवडीत पुणे जिल्हा सरचिटणीस म्हणून सौ.प्रिया सागर जगताप यांची निवड करण्यात आली. मंत्री छगनराव भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्याहस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

 यावेळी कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, विधानपरिषद सदस्य पंकज भुजबळ, महिला प्रदेशाध्यक्ष मंजिरी धाडगे,ईश्वर बाळबुद्धे, सरचिटणीस महाराष्ट्र राज्य,स्नेहा सोनकाटे शंकरराव लिंगे, विभागीय संघटक सोमनाथ भुजबळ,जिल्हाध्यक्ष अनिल लडकत, पुणे शहर अध्यक्ष पंढरीनाथ बनकर, महिला अध्यक्षा निलम होले, पुणे शहर कार्याध्यक्ष वैष्णवी सातव,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख किशोर भाऊ वचकल,दौंड तालुका अध्यक्ष विजय गिरमे, जिल्हा उपाध्यक्ष रोहिदास कुदळे, प्रदीप बनसोडे, समता परिषदेचे युवा नेते प्रसाद नाळे,मा.सरपंच जयश्री भागवत,नवनियुक्त दौंड तालुका अध्यक्षा सौ.उमा कुलंगे, नवनियुक्त जिल्हा उपाध्यक्षा शितल बनकर,नवनियुक्त तालुका अध्यक्षा अभिलाषा वचकल, नवनियुक्त बारामती तालुका अध्यक्षा राणी जमदाडे, नवनियुक्त हवेली तालुका अध्यक्षा किशोरी रेठेकर आदी मान्यवरांसह राज्यातील समता सैनिक उपस्थित होते. या निवडीबद्दल सौ.प्रिया जगताप यांचे अनेकांनी कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button