पुणेमहाराष्ट्र

डिकसळ सोसायटीचा सेवक झाला संस्थेचा मालक.

भिगवण प्रतिनिधी:-

 डिकसळ (ता.इंदापुर) येथील योगेश्वरी विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या थकबाकीदार संचालकांना अपात्र ठरवण्याची मागणी लाल फितीत अडकली असुन,सहाय्यक निबंधक यांच्या आदेशाला चक्क सचिवच केराची टोपली दाखवत असल्याने थकबाकीदार संचालकांना अपात्र ठरवण्याची मागणी केवळ कागदी घोडे नाचवण्यात धन्यता मानत आहे

 योगेश्वरी विविध कार्यकारी सोसायटीमध्ये काही संचालक थकबाकीदार असल्याने त्यांना अपात्र ठरवण्याची मागणी संस्थेचे सभासद व संचालक जिजाराम पोंदकुले यांनी इंदापुरचे सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेकडे केली आहे.

त्यावरून संबधित सहाय्यक निबंधक बी.के.शिवरकर यांनी संस्थेच्या सचिवांना थकबाकीदार संचालक यादी मागवत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. परंतु सचिवांनी माहिती सादर केली नाही.

      त्यावरून सहाय्यक निबंधक शिवरकर यांनी दि.१ एप्रिल रोजी सचिवांना कडक शब्दात नोटीस देत यामध्ये आपण दि.३० मार्च रोजी संस्थेत कर्ज भरणा येत असल्याने सायंकाळी ६ वाजेपर्यंत संस्थेचे मुख्यालय सोडता येत नाही असे कळवले व दि १ एप्रिल पर्यंत मुदतची मागणी केली. परंतु त्यानंतरही सुनावणीला अनुपस्थितीत राहिल्याचा ठपका सचिवावर ठेवला आहे.

    यानंतर शिवरकर यांनी सचिवांना दिलेल्या पत्रानुसार दि.१३ एप्रिल पर्यंत थकबाकी संचालकांची वस्तुनिष्ठ माहिती अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.व सचिव व थकबाकीदार संचालक यांनी आपले म्हणणे सादर न केल्यास किंवा म्हणणे असमाधान कारक असल्यास यथोचित कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

मात्र तरीही सचिव सिकंदर आत्तार हे सहाय्यक निबंधक यांना माहिती सादर करीत नसल्याचा आरोप तक्रारदार जिजाराम पोंदकुले यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button