महाराष्ट्र
तालुकास्तरीय वेशभूषा स्पर्धेत काव्या ढवळे प्रथम.

गणेश सुपेकर अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी
श्रीगोंदा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी- विद्यार्थिनींच्या तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा नुकत्याच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीगोंदा मुले या ठिकाणी उत्साहात संपन्न झाल्या.
स्पर्धेमध्ये ढोकराई फाटा येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता २ ची विद्यार्थिनी कु.काव्या कैलास ढवळे हिने संत गाडगे महाराज यांचे वेशभूषा सादर करून उपस्थितांची मने जिंकणारे विचार व्यक्त करत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
काव्या हिला शिक्षक श्री. व सौ. साबळे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.जिल्हास्तरीय वेशभूषा स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल काव्याचे शिक्षण विस्तार अधिकारी निळकंठ बोरुडे , केंद्रप्रमुख श्री.भुकन , मुख्याध्यापक सौ.संगीता लगड, यांच्यासह शिक्षक, पालक, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.











