श्रीमती रतनबाई चंद्रकांत प्रशाला नवागड आनंद नगरी महोत्सव उत्साहात संपन्न .

बालासाहेब ठोळे तालुका प्रतिनिधी
परभणी: तालुक्यातील श्रीमती रं.च. सोनटक्के प्रशाला नवागड शाळेत दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी आनंदनगरी महोत्सव उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रल्हाद आवकाळे मा.ग्रा.पंचायत सदस्य. नारायण उर्फ इंद्रजीत देशमुख, .डि के ठोळे तालुकाध्यक्ष सावता परिषद, प्रकाश कहाते पोलीस पाटील,गजानन माने,बालाजी डुकरे,शाळेचे मुख्याध्यापक देवानंद अंबुरे यांच्या हस्ते कार्यक्रमा चे उद्घाटन झाले. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे पदार्थ तयार करून विक्री साठी आणले होते तसेच फळे भाजीपाला देखील आणला होता .विद्यार्थ्यांनी बनवलेल्या पदार्थाची चव चाखण्यासाठी पालक वर्गाने गर्दी केली होती. पालक प्रत्येक स्टॉल ला भेट देवून विविध पदार्थ खरेदी करत होते. उखळद ,बाभळी,पिपरी देशमुख, येथिल ग्रामस्थ, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











