महाराष्ट्र

टोकर टोकर 

Happy Holi

💐💐💐Happy Holi💐💐💐💐

टोकर टोकर

 

टोकर टोकर करून

तुह्य पोटभर पेन

लसन कांदया संग

खळे मिठाचे खान !!

 

टोकर टोकर पेत होता

गच्च डोये लाऊन

आज डोये नाहीत फाकत

समोर बंफर पाहुन !!

 

घोटभर घेता घेता

कसा पव्यावर गेला

चांगला चांगला म्हणता

तू बेवड़ा कसा झाला !!

 

देशी गटागटा पेत

नाक पक्क दाबुन

हाती काही नाही उरत

गड्या राब राब राबुन !!

 

पेत संत्रा बॉबी ट्यांगो

तोंड करून तू हेकोळ

टोकर टोकर दारूपाई

झाल संसाराच वाटोळ !!

 

म्हणून म्हणतो गड्या

तू सोड हा खुळा नाद

लेकरं,बाईल संग

संसारी सुखानं नांद !!

✍️✍️वासुदेव महादेवराव खोपड़े

सहा पोलीस उपनिरीक्षक(सेनी)

अकोला 9923488556

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button