समाज कार्याचे युवापर्व – राहुल घायाळ
सावता परिषद सोशल मीडिया प्रमुख जालना जिल्हा पदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.

संपादकीय :-
तरुण तडफदार कार्यकर्ता, सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवताना गट तटाचे राजकारण न करता प्रश्न सोडवणे सामान्य माणसाला मदत करणे. असे गुण सर्वच माणसामध्ये नसतात, असा हा विश्वासू कार्यकर्ता सावता परिषदेच्या माध्यमातुन मोठा जनसंपर्क तयार करून प्रत्येकांच्या कार्याची दखल घेत आपल्याला या मधुन कोणत्या गोष्टी नवीन करता येतील, सर्वसामान्यांना त्याचा फायदा कसा होईल, सरकारी योजना कोणत्या प्रकारे राबवता येतील हा विचार मनाशी बाळगुण कायम कार्य दक्ष असणारा सक्रिय कार्यकर्ता पक्ष गट तट हे फक्त तेवढ्या पुरते मर्यादीत समाज कार्यत नेहमी अग्रेसर असणारा राजकीय क्षेत्रात कार्य करत असताना सर्वसामान्य जनतेच्या सुख दुःखात सामील होऊन, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न अगदी पोटतिडकीने सोडविणारा अवलिया म्हणून राहुल घायाळ नाव नक्कीच जालना जिल्हा व जिल्ह्याबाहेर तसेच महाराष्ट्रात देखील नाव नक्कीच निघते. सर्वसामान्य माणसाने फोन केला आणि राहुल घायाळ यांनी प्रतिसाद दिला नाही असे कधी घडलेच नाही. दिलखुलास व्यक्ति समाजिक कार्याबरोबर राजकारणाचा दाडंगा अभ्यास कुठे कसं आणि काय होऊ शकत हे गणित अचुक पणे व ठाम पणाने सांगु शकतो. राजकीय विश्लेषक म्हणून ते नक्कीच प्रसिद्ध आहेत. आम्ही पत्रकारीतेच्या माध्यमातून संपर्कात आलो . प्रत्येक अडचणीत एक पत्रकार मित्र म्हणून नक्कीच मदत करायला तत्पर तसेच कोणतेही काम असो त्याबद्दल चे निरासरण लगेच बरोबर घेऊन फिरणारा या अवलिया मित्र म्हणजे राहुल घायाळ. शांत संयमी पण रोख ठोख बोलंण प्रत्येक उत्तर संयमाने कोणत्याही कार्याचे नियोजन अगदी व्यवस्थित च कोणतं काम द्या योग्य रितीनेच हाताळण्याची क्षमता. असे आमचे मित्र राहुल घायाळ सर यांची सावता परिषद सोशल मीडिया प्रमुख जालना जिल्हा पदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.










