महाराष्ट्र

ढोरजळगाव ने शाळेची विविध राज्यस्तरीय स्पर्धेत उत्तुंग भरारी.

सोपान सासवडे

जिल्हा प्रतिनिधी अहिल्यानगर.

शेवगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोरजळगाव ने शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे . लक्ष्यवेध व मंथन या राज्यस्तरीय स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठे यश मिळविले आहे . शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांनी या स्पर्धा परीक्षेत आपला ठसा उमठवला आहे . लक्ष्यवेध स्पर्धा परीक्षेत कु . समृद्धी सोपान सासवडे हिचा राज्यात सहावा क्रमांक आला आहे . तर मंथन परीक्षेत जिल्हयात नववा व केंद्रात तिसरा क्रमांक आला आहे . कु . अक्षरा संदिप गिऱ्हे या विद्यार्थीनीचा लक्ष्यवेध परीक्षेत राज्यात सातवा क्रमांक आला आहे . तर मंथन परीक्षेत जिल्ह्यात आठवा व केंद्रात दुसरा क्रमांक आला आहे . कु . भक्ती किरण बुटे हिचा लक्षवेध परीक्षेत राज्यात अकरावा व जिल्ह्यात चौथा क्रमांक आला आहे . चि . यश रमेश फुलमाळी याने लक्ष्यवेध परीक्षेत केंद्रात प्रथम क्रमांक मिळविला आहे .

चि .आदर्श विकास कराड याने मंथन परीक्षेत केंद्रात प्रथम क्रमांक मिळविला आहे . तसेच कु . आरोही प्रशांत खामकर हिने मंथन परीक्षेत केंद्रात पाचवा क्रमांक मिळविला आहे . विद्यार्थ्यांनी या विविध स्पर्धा परीक्षेत ठसा उमटविला आहे . विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य , सरपंच व उपसरपंच , सोसायटी चेअरमन व व्हा . चेअरमन , पालक व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button