महाराष्ट्र

दमयंतीबेन चंद्रकांतभाई शहा यांचेकडून गोवर्धन गोशाळेस मदत.

राक्षाई बहुउद्देशीय सेवा संस्था संचलित गोवर्धन गोशाळा राक्षसवाडी बुद्रुक येथील गोमातेच्या पाणी पिण्याची गैरसोय लक्षात घेऊन श्री कमलेश भाई सावला मानद पशु कल्याण अधिकारी मुंबई यांच्या प्रेरणेतून दमयंतीबेन चंद्रकांतभाई शहा यांनी 30 फुट लांबीचा हौद गाईना पाणी पिण्यासाठी स्वखर्चातून बांधून दिला हिंदू धर्माचं आराध्य दैवत गोमाता ही राजमाता आहे हे लक्षात घेऊन सामाजिकतेचे भान राखून त्यांनी अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई लक्षात घेता पाण्यासाठी गाईचे हाल होऊ नये म्हणून पाण्याचा हौद बांधून दिला.

गोवर्धन गोशाळेच्या माध्यमातून गरजु शाळकरी मुलांना वही वाटप, असे अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यात येतात. यावेळी राक्षाई बहुद्देशीय सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. हनुमंत महाराज पावणे यांनी कमलेशभाई सावला व दमयंतीबेन चंद्रकांतभाई शहा यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button