महाराष्ट्र

समृद्धी सासवडे ,अक्षरा गिऱ्हे ,भक्ती बुटे ,यांची राज्य गुणवत्ता यादीमध्ये निवड. 

सोपान सासवडे

जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी अहिल्यानगर.

लक्षवेध राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव ने येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता दुसरीच्या वर्गातील विद्यार्थिनी समृद्धी सोपान सासवडे १५०/१४० गुण मिळवून राज्यात गुणवत्ता यादीत सहावा क्रमांक पटकावला. तसेच अक्षरा गिऱ्हे १५०/१३८ गुण मिळून राज्य गुणवत्ता यादीत सातवा क्रमांक पटकावला. तसेच भक्ती बुटे हिने १५०/१३० गुण मिळवून राज्य गुणवत्ता यादीत अकरावा क्रमांक पटकावला. खेडेगावातील विद्यार्थिनी असून त्यांनी हे नेत्र दीपक यश संपादन केले तसेच ढोरजळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा डंका राज्यभर गाजवला. या गुणी विद्यार्थिनींना घडवण्याचे कार्य त्यांचे वर्गशिक्षक राजेंद्र शेळके सर यांनी केले. शेळके सरांनी मुलांसाठी जादा तासिका सुरू केल्या होत्या. मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचे कार्य शेळके सरांनी केले. एकाच वर्गातील तीन विद्यार्थिनी राज्य यादीत झळकल्यामुळे पालकांनीही शिक्षकांचा सत्कार केला. लक्षवेध राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना प्राथमिक शाळा ढोरजळगाव ने येथील मुख्याध्यापक शिर्के सर, बडे मॅडम, लांडे मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ शाळेमध्ये मोठ्या दिमाखात पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button