पंचायत समितीची निवडणूक ताकतीने लढणार वैभव हराळ.

अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी :-
आगामी पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने श्रीगोंदा तालुक्यात आपली ताकद झोकून दिली आहे. मनसेचे उपजिल्हाध्यक्ष वैभव हराळ हे निवडणुकीत सक्रिय झालेले दिसून येत आहे. त्याचे गावभेट दौरे गेले तीन चार महिन्यापासून चालू आहेत. त्याचा जनसंपर्क पाहता तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसून येत आहेत. सर्वसामान्यांचा नेता अशी त्याची ओळख असून गावभेटी दरम्यान गावातील समस्या तसेच वीज, रस्ते, पाणी, मुलभूत गरजा, शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्याचे ठाम भूमिका घेऊन ते मैदानात उतरणार आहेत. राज ठाकरे यांच्या आदेशानुसार सर्वसामान्य जनतेला युवक वर्ग व नव्या चेहऱ्यांना संधी देण्यावर पक्षाचा भर राहील. येणारी निवडणूक ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी देखील होऊ शकते तरीदेखील आपण जनशक्ती च्या जोरावर पंचायत समिती मध्ये आपले प्रतिनिधित्व वाढवण्यावर आपला भर राहील व ते आपण पूर्ण करू असे स्पष्ट मत वैभव हराळ यांनी व्यक्त केले.










