पुणे

अ.भा.महात्मा फुले समता परिषदेकडून ओंकार वचकल याची पुणे शहर पोलिस पदी निवड झाल्याबद्दल सत्कार.

सासवड, ता. ३० : वीर (ता. पुरंदर) येथील शेतकरी कुटुंबातील ओंकार पांडुरंग वचकल (वय२१)याची पुणे पोलीस पदी निवड झाली आहे. अपार कष्ट, सुविधांचा अभाव आणि प्रतिकूल परिस्थितींवर जिद्दीने मात करत ओंकारने पुणे शहर पोलिस दलात खुल्या प्रवर्गातून महाराष्ट्रातून तिसऱ्या क्रमांकाने निवड मिळवत संपूर्ण गावाचा अभिमान वाढवला आहे. खुल्या प्रवर्गातून पहिल्याच प्रयत्नात पुणे महाराष्ट्र पोलीस पदी तिसऱ्या क्रमांकाने निवड झाल्याबद्दल अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद पुरंदर तालुका व पुणे जिल्ह्याच्या वतीने सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या वेळी मा.नगरसेवक सुहासबापू लांडगे, पत्रकार आदर्श शिक्षक पुरंदर सोशल फाउंडेशन अभ्यासिकेचे सर्वेसर्वा मा.गणेश लोणकर सर, उपाध्यक्ष समता परिषद योगेश जांभुळकर समता परिषदेचे उपाध्यक्ष व मा.सरपंच किसन वाघोले, समता परिषद सरचिटणीस व ओबीसी सेल अध्यक्ष सागर जगताप, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख समता परिषद पुणे किशोर भाऊ वचकल,नगरसेवक प्रदीप राऊत,मा.नगरसेवक संतोष गिरमे,सासवडचे युवा उद्योजक किरण वचकल,शिवम वाघ,अक्षय वचकल आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button