नागवडे इंग्लिश स्कूल मध्ये विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञान प्रदर्शन संपन्न.
शालेय स्तरावर विज्ञान दिन साजरा केल्याने विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन तयार होऊन कल्पनाशक्ती वाढते - नीतू दुलानी

अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी
तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्रदादा नागवडे,विश्वस्त अनुराधाताई नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २८ फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक उपकरणे तयार करून त्याबद्दल माहिती दिली. यामध्ये स्मार्ट सिटी, ऍसिड रेन, जलशुद्धीकरण प्रकल्प,ग्रहमाला, साउंड ब्रीज इ. प्रकारचे वैज्ञानिक उपकरणे विद्यार्थ्यांनी सादर केले. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान चे निरीक्षक एस.पी.गोलांडे व मुख्याध्यापिका नीतू दुलानी यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की शालेय स्तरावर विज्ञान दिन साजरा केल्याने विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन तयार होऊन कल्पनाशक्ती वाढण्यास मदत होते. असे मत त्यांनी व्यक्त केले. त्याबरोबर विज्ञान दिनाचे महत्व सागितले. यावेळी विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विज्ञान शिक्षक प्रा. राहुल कोऱ्हाळे, प्रा. योगेश सागडे, प्रा. कावेरी शिंदे, प्रा. सुरज घोडेकर, प्रा. अक्षय मेहेत्रे, प्रा.शुभांगी गायकवाड, प्रा. आसमा इनामदार यांचे सहकार्य लाभले. यावेळी सूत्रसंचालन प्रा. योगेश सागडे यांनी केले आभार प्रा. अक्षय म्हेत्रे यांनी मानले.










