Uncategorized

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रा.सुरेश म्हेत्रे यांना प्रदान..

गणेश सुपेकर अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी

द युवा ग्रामीण पत्रकार संघ यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार श्रीगोंदा तालुक्यातील पत्रकार सुरेश म्हेत्रे यांना प्रदान करण्यात आला. ग्रामीण प्रतिनिधि ते उपसंपादक अशी पदे त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात भूषवली आहेत. दैनिक समताभूमी न्युज नेटवर्क मध्ये उपसंपादक,दैनिक एकनिष्ठा, दैनिक शब्दभूमी या वृत्तपत्रामध्ये त्यांनी कार्य करत आहेत. त्याबरोबर राजकीय विश्लेषक म्हणून देखील त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. यावेळी पोलिस निरीक्षक श्री. उमेश परदेशी, शांतीब्रम्ह एकनाथ महाराज यांचे १३ वंशज ह.भ.प. श्रीनाथ महाराज गोसावी, व्याख्याते व साहित्यिक सुभाष सोनावणे, अण्णा पारधे होमगार्ड जिल्हा प्रशासक अधिकारी, अन्सार शेख राष्ट्रीय अध्यक्ष, शकील मणियार राज्य अध्यक्ष, बाळासाहेब कोटुळे राज्य सचिव, भैय्यासाहेब बॉक्सर अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष, शरद कासार अहिल्यानगर तालुका अध्यक्ष या वेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button