नागवडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये फादर्स डे उत्साहात साजरा.
विद्यार्थ्यांच्या नृत्याने पालक मंत्रमुग्ध.

अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी
तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान संचलित नागवडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये फादर्स डे अर्थात ‘पितृ दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे निरीक्षक बी. के लगड यांनी भूषविले. तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे निरीक्षक एस पी गोलांडे, सोनिया गांधी पॉलिटेक्निकचे प्राचार्य अमोल नागवडे उपस्थित होते.
या प्रसंगी वेदांत गाडेकर आणि आकांशा रोडे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच प्रा.घोडके यांनी एकत्र कुटुंब पद्धती आणि त्याचे फायदे या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. तसेच विकास खेतमाळीस यांनी पितृ दिवस का साजरा केला जातो व आपल्या मुलांना मोबाइलला पासून दूर ठेवावे असे स्पष्ट मत व्यक्त केले व फादर्स डे चा स्तुत्य उपक्रम साजरा करत असल्याबद्दल शालेय प्रशासनाचे कौतुक केले.
प्रसंगी विद्यार्थिनींनी केलेल्या सुंदर अश्या नृत्याने उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा पाणवल्या तर दमलेल्या बापाची कहाणी तुला’ या गीताच्या गायनाने मुले आणि वडिलांच्या नात्यातील भावनिकता अधोरेखित केली. यावेळी पालकांसाठी बलून रेस व कोन बॅलन्ससिंग खेळांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व पालकांनी उत्स्फूर्तपणे खेळामध्ये सहभाग घेऊन आनंद घेतला. आपल्या वडिलांना खेळताना पाहून सर्व विद्यार्थ्यांनी जल्लोष केला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापिका नीतू दुलानी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जयेश आनंदकर व प्रा.राहुल भांडवलकर यांनी तर प्रा. सुरेश म्हेत्रे यांनी आभार मानले.











