श्री शिवाजीराव नागवडे विधी महाविद्यालयाचा एल.एल.बी. प्रथम वर्षाचा १०० टक्के निकाल.

अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी:-
श्रीगोंदा येथील तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान संचलित श्री शिवाजीराव नागवडे विधी महाविद्यालयाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एल.एल.बी. (त्रैवार्षिक) प्रथम वर्षाच्या परीक्षेत शंभर टक्के निकालाची उल्लेखनीय परंपरा कायम राखली आहे.
या परीक्षेत कु. मंजिरी मुरकुटे यांनी प्रथम क्रमांक पटकावत महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले . कु. साक्षी मचाले व श्री रूपेश पोखरणा यांनी संयुक्तरीत्या द्वितीय क्रमांक मिळविला असून राहत जावेद शेख यांनी तृतीय क्रमांक संपादन केला आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री राजेंद्रदादा नागवडे, संस्थेचे सचिव सौ. अनुराधा ताई राजेंद्रदादा नागवडे, निरीक्षक मा. श्री सूर्यभान गोलांडे तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अंजुला चौबे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या यशामागे महाविद्यालयातील प्राध्यापक वर्गाचे मार्गदर्शन लाभले असून प्रा. रुपाली गोळे व डॉ. दिपाली मोरे यांच्या शैक्षणिक मार्गदर्शनाचे विशेष योगदान लाभल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
महाविद्यालयाच्या शंभर टक्के निकालामुळे विद्यार्थी, पालक व परिसरातील नागरिकांकडून महाविद्यालयाचे कौतुक होत असून संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.










