Uncategorized

दिग्विजय काकडे यांच्या हस्ते महेश जाधव यांची ‘पुणे जिल्हा (दक्षिण) किसान मोर्चा उपाध्यक्ष’ पदी नियुक्ती

निरा/सुपे: भारतीय जनता पार्टी, पुणे जिल्हा ग्रामीण (दक्षिण) च्या किसान मोर्चात महत्त्वाची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षासाठी आतापर्यंत केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत, श्री. महेश गोविंद जाधव (रा. खंडुखैरेवाडी, सुपे) यांची ‘पुणे जिल्हा (दक्षिण) किसान मोर्चाचे उपाध्यक्ष’ म्हणून निवड करण्यात आली आहे.

भारतीय जनता पार्टी, पुणे जिल्हा ग्रामीण (दक्षिण) चे जिल्हाध्यक्ष (किसान मोर्चा) श्री. दिग्विजय वसंतराव काकडे यांनी अधिकृत पत्र देऊन महेश जाधव यांना ही नियुक्ती जाहीर केली आहे.                                                                 या नियुक्तीबद्दल महेश जाधव यांचे अभिनंदन करताना जिल्हाध्यक्ष दिग्विजय काकडे यांनी आशा व्यक्त केली आहे की, महेश जाधव हे आपल्या नवीन जबाबदारीचा वापर करून जिल्ह्यातील पक्ष संघटना अधिक मजबूत करतील आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्परतेने काम करतील.                                           या निवडीमुळे महेश जाधव यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, पक्षाच्या ग्रामीण भागात त्यांना ही नवीन जबाबदारी मिळाल्याने कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button