Uncategorized

दादासाहेब फाळके चित्रपट युनियनच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी शेख वजीर यांची नियुक्ती.

संघटनेच्या विस्तारासाठी आणि कलाकारांच्या हक्कांसाठी करणार कार्य शेख वजीर.

अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी :-

दादासाहेब फाळके चित्रपट युनियनच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी पाथर्डी तालुक्यातील पाडळी येथील शेख वजीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन तसेच संघटनेच्या कार्याचा विस्तार करण्याच्या उद्देशाने ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.

शेख वजीर हे चित्रपट, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून, त्यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्हाात संघटना प्रभावीपणे वाढेल, असा विश्वास युनियनच्या पदाधिकान्यांनी व्यक्त केला.

नियुक्तीनंतर शेख वजीर यांनी संघटनेने दाखविलेल्या विश्वसाबद्दल आभार मानत, कलाकरांचे प्रश्न सोडविणे, नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देणे आणि संघटना अधिक बळकट करण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.

त्यांच्या नियुक्तीबद्दल विविध सामाजिक, सांस्कृतिक व चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.संघटनेच्या माध्यमातून कलाकारांच्या समस्या सोडविण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेतील, असा विश्वास व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button